Home Breaking News अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस दुहेरी जन्मठेप

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस दुहेरी जन्मठेप

वणी वृत्तवेध:-मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत आरोपीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती

प्राप्त माहितीनुसार आरोपी मारुती मधुकर भेंडाळे (वय 33, रा. पहापळ, ता. मारेगाव याच्याविरुद्ध भादंवि कलम 363, 366(अ), 376(AB), 377, 307 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .
या प्रकरणाचा तपास वणीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुंजलवर यांनी केला.

न्यायालयात सरकार पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता नीती दवे यांनी प्रभावीपणे मांडली, तर बचाव पक्षातर्फे सिद्धार्थ लोड यांनी काम पाहिले.सदर प्रकरणात सबळ पुरावे सिद्ध झाल्याने केळापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश अभिजित देशमुख यांनी 16 एप्रिल रोजी निकाल जाहीर केला.

न्यायालयाने आरोपीस कलम 363 अंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड कलम 366(अ) अंतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड,कलम 307 अंतर्गत जन्मठेप व 10,000 रुपये दंड,कलम 376(AB) अंतर्गत आजीवन कारावास व 10,000 रुपये दंड पोक्सो कायद्यांतर्गत कलम 8 अंतर्गत 5 वर्षे सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड न भरल्यास अतिरिक्त सश्रम कारावासाची तरतूदही न्यायालयाने केली आहे.

सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश देण्यात आले असून, पीडित मुलीस 40 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.या निकालामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश समाजात गेला आहे.

Previous articleभरधाव बाईकर्स वर अंकुश लावण्याची गरज
Next articleवणीत एम डी ड्रग्ज जप्त, दोघे ताब्यात
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे