
चंद्रपूर शहरातील वादग्रस्त पुरसंरक्षण भिंतीचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला. आपले व्यावसायिक भागीदार पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आकाशवाणी वॉर्डात एका नैसर्गिक नाल्यावर पुरसंरक्षक भिंत प्रस्तावित।केली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासाठी सुमारे 1 कोटींचा निधी दिला. आणि जलसंधारण विभागाने तातडीने ही भिंत बांधून काढली. भिंत पुरासाठी नव्हे तर आलिशान घर वाचविण्यासाठी बांधली गेली. आमदारकीचा वापर खाजगी फायदा पोचविण्यासाठी करण्याचे हे प्रकरण विधिमंडळात गाजले. माजी मंत्री भाजपचे आ. सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला यावरून चांगलेच कोंडीत पकडले.
Chandrapur यावर आ. जोरगेवार यांना खुलासा करताना नाकी नऊ आले. तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांना भाजपच्या इतर आमदारांकडून लक्ष्य केले जात असताना आता मुनगंटीवार यांनी थेट हे प्रकरण विधिमंडळात उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा स्फोट मात्र यानिमित्ताने झालाय.








