Home Breaking News Chandrapur मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम (कंटेनर सर्वे) सुरू – ब्रिडींग चेकर्स...

Chandrapur मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम (कंटेनर सर्वे) सुरू – ब्रिडींग चेकर्स करणार घरांची तपासणी, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन… chandataknews

0
23

Chandrapur चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागाने संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी ‘डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम’ (कंटेनर सर्वे) सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक घराची तपासणी आरोग्य पथकाद्वारे करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या ब्रिडींग चेकर्सना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. chandataknews

 

पावसाळ्यात डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. घरातील कूलर, टायर, कुंड्याखालील प्लेट, फ्रीजच्या ट्रे, पाण्याचे ड्रम, फिश टँक, एसीचे पाणी पडणारे कंटेनर, भंगारातील वस्तू, डबे, बंद घरांची छते, मोकळे भूखंड, बांधकाम स्थळे अशा ठिकाणी पाणी साचून राहते आणि त्याठिकाणी डासांची पैदास होते. ही संभाव्य डासोत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी आणि नागरिकांना जागरूक करण्यासाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. नयना उत्तरवार यांच्या नियंत्रणात २८ ब्रिडींग चेकर्स, ३२ एएनएम, २२ एमपीडब्लू, १७० आशा वर्कर आणि स्वच्छता निरीक्षकांची टीम ही मोहीम राबवत आहे.

डेंग्यू डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करून, पुसून वाळवावीत. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकावे किंवा मोठ्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडावेत, जे डासांची अंडी खातात. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, म्हणजे सर्व कंटेनर रिकामे व कोरडे ठेवावेत, जेणेकरून डासांची उत्पत्ती रोखता येईल.

 

डेंग्यूची लक्षणे:

ताप येणे

अंगावर पुरळ

डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे

पाठदुखी, डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी

 

ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, स्वतः औषधे घेऊ नयेत. डेंग्यू सामान्य आजार असला तरी अपुरी माहितीमुळे तो जीवघेणा ठरू शकतो.

 

बचावासाठी उपाय:

 

घरातील एक व्यक्तीने दररोज १० मिनिटे पुढील १० आठवडे सर्व पाणी साठवणारी भांडी तपासावीत.

आधी रुग्ण आढळलेल्या किंवा संभाव्य दुषित घरांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचू न देण्यासाठी दक्षता घ्यावी.

मनपा प्रशासन नागरिकांना सातत्याने माहिती व जनजागृती करत आहे. या मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य केल्यास डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांपासून बचाव शक्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here