Home Breaking News Chandrapur…. डॉ. अशोक जीवतोडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख एक्कावन हजार...

Chandrapur…. डॉ. अशोक जीवतोडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख एक्कावन हजार रुपयांची थेट मदत

0
205

Chandataknews

Chandrapur

 

डॉ. अशोक जीवतोडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख एक्कावन हजार रुपयांची थेट मदत – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला दिला सकारात्मक प्रतिसाद

 

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान द्यावे, या आवाहनाला भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

डॉ. जीवतोडे यांनी सोमवार, दि. २१ जुलै रोजी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”स एक लाख एक्कावन हजार रुपये इतक्या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. विनय गौडा यांच्याकडे सुपूर्त केला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस दि. २२ जुलै रोजी असून, तो कोणत्याही धुमधडाक्यात न साजरा करता जनतेच्या सेवेसाठी, समाजोपयोगी कार्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखून जाहिराती, फलक, पुष्पगुच्छ, हार इत्यादींवर खर्च न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते.

 

याच भूमिकेतून प्रेरित होऊन डॉ. अशोक जीवतोडे यांनी निधीस थेट मदत देत पुढाकार घेतला. त्यांच्या या कृतीतून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. डॉ. जीवतोडे हे ‘चांदा शिक्षण प्रसारक मंडळा’चे संस्थापक असून, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य आणि मदतीच्या क्षेत्रांत सातत्याने साथ दिली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आणि कोविडग्रस्त पालकांचे अपत्यांना  संस्थेमार्फत सर्व शाखांमध्ये निःशुल्क प्रवेश देण्यात येतो.

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपयोग राज्यातील आणि देशातील पूर, दुष्काळ, आगीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित नागरिकांना तत्काळ मदत करण्यासाठी तसेच दुर्बल घटकांतील रुग्णांना गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी केला जातो.

 

या प्रसंगी त्यांचे सहकारी संजय सपाटे, शंकरराव सुकळकर, ओबीसी पदाधिकारी नितीन कुकडे, डॉ. आशिष महातळे, रवि देवाळकर, रविकांत वरारकर, महेश यार्दी, विष्णु ठाकरे, रवि जोगी, सुनील मुसळे, संदीप माशिरकर, राहुल देशमुख तथा भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

ही कृती इतर समाजसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल, आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अधिकाधिक व्यक्तींनी पुढाकार घेऊन समाजकार्यात सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here