Chandataknews
Chandrapur
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ६६ जागांसाठी तब्बल ४४० जणांनी अर्ज दाखल केल्याने पक्षाची अंतर्गत चुरस आणि संघटनशक्ती स्पष्टपणे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर जैन भवन येथे सर्व इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक घेण्यात आली.बैठकीत महानगर निवडणूक प्रमुख आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा आणि एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, उमेदवार एक असला तरी विजयाची खरी ताकद कार्यकर्त्यांमध्येच असते. या बैठकीस भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते विजय राऊत, महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर राखी कंचार्लवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि इच्छुक उपस्थित होते.
येत्या काही दिवसांत अर्जांची तपासणी करून अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यात येणार असून, सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली असली, तरी इच्छुकांची ही प्रचंड संख्या पाहता तिकीटवाटपाची मोठी परीक्षा आता पक्ष नेतृत्वासमोर उभी राहिली आहे.








