Home Social चिमुकल्यांच्या वाढदिवसाला “वणी वृत्तवेध”ची खास भेट

चिमुकल्यांच्या वाढदिवसाला “वणी वृत्तवेध”ची खास भेट

◆ पाच वर्षांपर्यंत वाढदिवसाची जाहिरात मोफत

वणी वृत्तवेध :आपल्या घरातील लाडक्या चिमुकल्याचा वाढदिवस प्रत्येक पालक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतो. मात्र अनेक नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांपर्यंत शुभेच्छा पोहोचत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन “वणी वृत्तवेध”न्यूज पोर्टलने पालकांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या मुलगा किंवा मुलीच्या वाढदिवसाची जाहिरात “वणी वृत्तवेध” न्यूज पोर्टलवर पूर्णपणे निशुल्क प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यासाठी पालकांनी वाढदिवसाच्या किमान दोन दिवस अगोदर 8421729436 किंवा 9822367302 या मोबाईल क्रमांकावर WhatsApp द्वारे चिमुकल्याचा फोटो, पूर्ण नाव, गाव तसेच शुभेच्छुकांची नावे पाठवायची आहेत. आकर्षक वाढदिवस शुभेच्छा जाहिरात “वणी वृत्तवेध”वर प्रकाशित करण्यात येईल.

आपल्या लाडक्या चिमुकल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि वाढदिवस अधिक खास बनवण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन “वणी वृत्तवेध”तर्फे करण्यात आले आहे.

Previous articleतहान भागवणाऱ्या पाणपोई झाल्या गायब
Next articleउद्या लागणार दहावीचा निकाल,विद्यार्थ्यांची वाढली धडधड
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे