Home Wani चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे काढण्यात आले भव्य तिरंगा रॅली,

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे काढण्यात आले भव्य तिरंगा रॅली,

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन ऑपरेशन ‘सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी करण्यात आले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. या रॅलीत आमदार देवरावदादा भोंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही तिरंगा रॅली भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आली होती.