Home Social कडाक्याच्या उन्हात कामगारांना दिलासा

कडाक्याच्या उन्हात कामगारांना दिलासा

◆ रोटरी क्लबचा संवेदनशील उपक्रम

वणी वृत्तवेध : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने वणीतील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविला. शहरातील मोठी कमान आणि बसस्थानक परिसरात कडाक्याच्या उन्हात काम करणाऱ्या २०० हून अधिक कामगारांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी कापडी दुपट्ट्यांचे वितरण करण्यात आले.

सध्या वणी परिसरात तापमानाने ४५ अंशांचा टप्पा गाठला असून, अशा तीव्र उष्णतेतही अनेक कामगार आपले कष्टाचे काम अखंडपणे करताना दिसतात. रस्ते, बांधकाम, वाहतूक किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांचे श्रमच शहर आणि देशाच्या विकासाचा पाया मजबूत करतात. याच जाणिवेतून रोटरी क्लबने हा उपक्रम राबवत त्यांच्या कष्टाला एक प्रकारे सलाम केला.

यावेळी क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल यांनी सांगितले की, “कामगार हा समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. उन्हाच्या झळा सहन करत ते आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या छोट्याशा उपक्रमातून आम्ही त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत

कार्यक्रमात प्रोजेक्ट डायरेक्टर प्रिया केडिया यांच्यासह माजी अध्यक्ष निखिल केडिया, अनिल उत्तरवार, अरुण कावडकऱ, संदीप जायसवाल, आशीष गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच क्लबचे सदस्य अचल जोबनपुत्रा, विनोद बाजोरिया, अनिल झाबक, शाहबुद्दीन अजानि, श्रेयस निखार, मनीष बत्रा,  शिल्पी जायसवाल, . रक्षा जोबनपुत्रा आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

Previous articleपैशांच्या वादातून रक्तरंजित हल्ला!
Next articleमारेगावात मध्यरात्री पुतळा, सकाळी तणाव!
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे