Home Breaking News पैशांच्या वादातून रक्तरंजित हल्ला!

पैशांच्या वादातून रक्तरंजित हल्ला!

◆ हातोड्याने डोक्यावर प्रहार
◆ टीव्ही मेकॅनिक गंभीर

वणी वृत्तवेध : शहरातील सावरकर चौक परिसरात आज दि. 1 मे पैशांच्या किरकोळ वादाने थेट हिंसक वळण घेत एक धक्कादायक घटना घडली. टीव्ही दुरुस्ती करणाऱ्या इसमाच्या डोक्यात हातोड्याने जबरदस्त प्रहार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप नासरे हे टीव्ही दुरुस्तीचे काम करतात. संदीप साखरकर याने आपल्या घरातील बिघडलेला टीव्ही दुरुस्तीसाठी नासरे यांच्याकडे दिला होता. मात्र दुरुस्तीला विलंब होत असल्याने साखरकरने नवीन टीव्ही खरेदी केला आणि आधी दिलेले पैसे परत मागितले.

यावरून दोघांमध्ये वाद पेटला. पैशांच्या परतफेडीवरून सुरू झालेली बाचाबाची काही क्षणातच हाणामारीत बदलली. संतापाच्या भरात संदीप साखरकर याने हातोडा उचलत दिलीप नासरे यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या भीषण हल्ल्यात नासरे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी संदीप साखरकर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Previous articleउत्सुकता संपली उद्या १२वी निकाल
Next articleकडाक्याच्या उन्हात कामगारांना दिलासा
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे