Home Breaking News उत्सुकता संपली उद्या १२वी निकाल

उत्सुकता संपली उद्या १२वी निकाल

◆ दुपारी 1वाजता जाहीर होणार

वणी वृत्तवेध :फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता १२वीच्या परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.विद्यार्थ्यांना आपला निकाल विविध अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन पाहता येईल. तसेच गुणपत्रिकेची प्रिंट काढता येईल आणि DigiLocker अ‍ॅपमध्ये डिजिटल मार्कशीटही मिळणार आहे.

निकालानंतर ज्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ५ दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.

तसेच पास झालेल्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी पुढील तीन संधी मिळणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही माहिती अमरावती विभागीय मंडळाने दिली आहे.

Previous articleमारेगावात मध्यरात्री उभारला शिवरायांचा पुतळा
Next articleपैशांच्या वादातून रक्तरंजित हल्ला!
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे