Home Breaking News मारेगावात मध्यरात्री उभारला शिवरायांचा पुतळा

मारेगावात मध्यरात्री उभारला शिवरायांचा पुतळा

  1. ◆ प्रशासन हटवण्याच्या तयारीत
    ◆ मारेगावात तणावपूर्ण परिस्थिती
    वणी वृत्तवेध :-मारेगाव येथील मार्डी चौकात शिवप्रेमींनी मध्यरात्री अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याची घटना समोर आली आहे. सकाळी ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी पुतळा हटविण्याची तयारी सुरू केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुतळा हटविण्याच्या निर्णयाला स्थानिक शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला असून, चौकात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, संपूर्ण मारेगाव परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यातील चर्चेनंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. परिसरात तणाव कायम असला तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Previous articleतहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा उत्साह
Next articleउत्सुकता संपली उद्या १२वी निकाल
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे