Home Breaking News तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा उत्साह

तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा उत्साह

◆आमदार देरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

वणी वृत्तवेध : 66 वा महाराष्ट्र दिन तहसील कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला आमदार संजय देरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.

या प्रसंगी आमदार देरकर यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच महाराष्ट्राच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय पोलीस अधिकारी दळवी, निवासी नायब तहसीलदार मनीष निमेकर, नायब तहसिलदार विवेक पांडे, ठाणेदार गोपाल उंबरकर, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleकामगारांच्या घामावर देशाची अर्थव्यवस्था
Next articleमारेगावात मध्यरात्री उभारला शिवरायांचा पुतळा
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे