Home Social कामगारांच्या घामावर देशाची अर्थव्यवस्था

कामगारांच्या घामावर देशाची अर्थव्यवस्था

◆ कामगार दिन विशेष रिपोर्ट
वणी वृत्तवेध:-

राष्ट्राच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा खरा केंद्रबिंदू जर कोणी असेल, तर तो म्हणजे कामगार. त्यांच्या कष्टमय श्रमावरच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे धागेदोरे विणले जातात. “श्रम हेच जयते” या विचाराची प्रचिती देत दरवर्षी १ मे हा दिवस कामगार गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातील कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला, मात्र त्याचवेळी त्यांच्या श्रमाचे शोषणही वाढले. या अन्यायाविरोधात उभ्या राहिलेल्या चळवळींमुळेच कामगारांना हक्क आणि सन्मान मिळू लागला. या ऐतिहासिक लढ्याची आठवण म्हणूनच १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो.

२१ व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढलेल्या प्रगतीमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. यंत्रांनी कामाचा वेग वाढवला असला, तरी खरी ऊर्जा आजही कामगारांच्या हातातच आहे. हे हात थांबले, तर यंत्रांची गतीही थांबेल, हे वास्तव नाकारता येणार नाही.

तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कमी झाले असले, तरी मानसिक ताण वाढला आहे.
जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगारांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. रोजगारातील अस्थिरता वाढत असून, कौशल्यविकासाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. कामगारांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, नव्या कौशल्यांचा विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.

बुद्धिवंत आणि श्रमिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी कामगारांना सन्मानजनक वेतन आणि आर्थिक स्थैर्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे. विटा उद्योग, कोळसा खाणी, बांधकाम क्षेत्र तसेच विविध उद्योगांमध्ये दिवसरात्र कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवनमान अजूनही कठीण परिस्थितीत आहे. त्यांच्या भवितव्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन धोरणांची गरज आहे.

सामान्य नागरिक म्हणून आपण किमान त्यांच्या श्रमाचा सन्मान करू शकतो. शेतात राबून आपली भूक भागवणारा शेतकरी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कामगार सन्मानाने जगले, तरच देशाच्या आर्थिक महासत्तेच्या स्वप्नांना खरी उभारी मिळेल, हे निश्चित आहे.
कामगार दिनानिमित्त समाजाने कृतज्ञतेने पुढे येण्याची गरज

 

Previous articleकामगार ते उद्योजक: राजाभाऊ बिलोरिया
Next articleतहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा उत्साह
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे