◆ रोटरी क्लबचा संवेदनशील उपक्रम
वणी वृत्तवेध : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने वणीतील रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविला. शहरातील मोठी कमान आणि बसस्थानक परिसरात कडाक्याच्या उन्हात काम करणाऱ्या २०० हून अधिक कामगारांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी कापडी दुपट्ट्यांचे वितरण करण्यात आले.

सध्या वणी परिसरात तापमानाने ४५ अंशांचा टप्पा गाठला असून, अशा तीव्र उष्णतेतही अनेक कामगार आपले कष्टाचे काम अखंडपणे करताना दिसतात. रस्ते, बांधकाम, वाहतूक किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांचे श्रमच शहर आणि देशाच्या विकासाचा पाया मजबूत करतात. याच जाणिवेतून रोटरी क्लबने हा उपक्रम राबवत त्यांच्या कष्टाला एक प्रकारे सलाम केला.

यावेळी क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल यांनी सांगितले की, “कामगार हा समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. उन्हाच्या झळा सहन करत ते आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या छोट्याशा उपक्रमातून आम्ही त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत


कार्यक्रमात प्रोजेक्ट डायरेक्टर प्रिया केडिया यांच्यासह माजी अध्यक्ष निखिल केडिया, अनिल उत्तरवार, अरुण कावडकऱ, संदीप जायसवाल, आशीष गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच क्लबचे सदस्य अचल जोबनपुत्रा, विनोद बाजोरिया, अनिल झाबक, शाहबुद्दीन अजानि, श्रेयस निखार, मनीष बत्रा, शिल्पी जायसवाल, . रक्षा जोबनपुत्रा आदींनी सक्रिय सहभाग घेतला.








