Home Breaking News घराकडे का बघतो म्हणून रक्तरंजित हल्ला”

घराकडे का बघतो म्हणून रक्तरंजित हल्ला”

◆ युवकाच्या डोक्यात सतूर हाणला

वणी वृत्तवेध :शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चारगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका 35 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. झोपेत असलेल्या युवकाच्या डोक्यात सतूरने वार करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

चारगाव येथील विक्की सातपुते (वय 35) हा घुगूस येथील एका खासगी कंपनीत काम करतो. तर त्याच्या घरा शेजारी शंकर डाखरे (वय 25) हा राहतो विक्की हा सारखा घराकडे पाहत असतो त्याला अनेकदा शंकर ने हटकले मात्र तो ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता

दि 13 मे ला दुपारी शंकर डाखरेने हातात सतूर घेऊन विक्कीच्या घरी प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या विक्कीच्या डोक्यावर जोरदार वार केला.या हल्ल्यात विक्की सातपुते गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शिरपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शंकर डाखरे याला अटक केली असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

Previous articleसिबीएसई बारावीत स्वर्णलीला ची महिमा अव्वल
Next articleबदलाची सुरुवात स्वतःपासून एसपी सायकलवर
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे