Home Social सिबीएसई बारावीत स्वर्णलीला ची महिमा अव्वल

सिबीएसई बारावीत स्वर्णलीला ची महिमा अव्वल

◆ स्वर्णलीला ची यशस्वी परंपरा कायम

वणी वृत्तवेध : केंद्रीय शिक्षण मंडळाने  बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल ने यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. बारावीत महिमा मिस्त्री हिने 91.02 टक्के गुण प्राप्त करत तालुक्यातून अव्वल येण्याचा मान पटकावला.

केंद्रीय शिक्षण मंडळाने  दि.13 मेला ला दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला यामध्ये स्वर्णलीला शाळेचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यशसंपादन केले आहे.  सी.बी. एस ई. नी आखून दिलेल्या नियमानुसार स्वर्णलीला शाळेच्या विद्यार्थ्यांनि आपली दरवर्षीची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महिमा मिस्त्री 91.02 टक्के,, चिन्मय राखुंडे 88.00 टक्के,इशिता तेहरा 87.87 टक्के गुण प्राप्त केले आहे.

स्वर्णलीला शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आणि इथला प्रत्येक विद्यार्थी या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक डॉ.नरेंद्र रेड्डी, प्राचार्य जे अन्नपूर्णा, उपप्राचार्य विकी मोहनानी व शिक्षकांना देतात.

Previous articleग्रामीण भागात पसरले आहे बनावटी बँक खात्याचे जाळे
Next articleघराकडे का बघतो म्हणून रक्तरंजित हल्ला”
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे