Home Social शतप्रतिशत निकालाने वणी लायन्स स्कूलचा मान उंचावला

शतप्रतिशत निकालाने वणी लायन्स स्कूलचा मान उंचावला

◆ लायन्स च्या गुणवतांचा सत्कार

वणी वृत्तवेध :-वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद, पालकांचा अभिमान आणि शिक्षकांच्या मेहनतीचे फलित या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स बलदेव खुंगर, विद्यालयाचे अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे तसेच प्राचार्या चित्रा देशपांडे उपस्थित होत्या.

यावेळी एस.एस.सी. परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तब्बल ७० विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. तसेच विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली.

अध्यक्षीय भाषणात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “यशासाठी मेहनत, शिस्त आणि सातत्य अत्यंत आवश्यक असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.” उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन लंकेश चुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleमोरेश्वर उज्वलकर विधान परिषदेच्या रिंगणात ?
Next articleजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे