Home Breaking News जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

◆ नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

वणी वृत्तवेध :दि. 29 व 30 मे 2026 रोजी वणी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यवतमाळ यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वादळी वातावरणामुळे झाडे, विजेचे खांब किंवा कमकुवत बांधकामे कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, नदी-नाले, तलाव परिसरात जाणे टाळावे तसेच वीज कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये, असे नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती साहित्य व जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हेल्पलाईन क्रमांक 07232-240720 आणि पोलीस नियंत्रण कक्ष 07232-256700 जारी करण्यात आले आहेत.

Previous articleशतप्रतिशत निकालाने वणी लायन्स स्कूलचा मान उंचावला
Next articleरुद्राक्षबनाचा गाजावाजा, पण प्रत्यक्षात ओसाडपणा
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे