Home Social डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर

डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर

◆ ‘नाट्य वेडा लोकशिक्षक’ मुलाखत प्रसारित

वणी वृत्तवेध : बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले लोक कलावंत डॉ. दिलीप अलोने यांची ‘नाट्य वेडा लोकशिक्षक’ या शीर्षकाखालील विशेष मुलाखत येत्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

ख्यातनाम लेखक व सूत्रसंचालक डॉ. विवेक अलोनी यांनी डॉ. अलोने यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी ही प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या कार्यक्रमाच्या निर्माती नागपूर दूरदर्शनच्या मीनल पाठराखे आहेत.

प्रयोगशील शेतकरी, विद्यार्थीप्रिय शिक्षक, जादूगार, नकलाकार, नाट्यलेखक व अभिनेते अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. दिलीप अलोने यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा ‘मस्त कलंदर’ हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे. या ग्रंथाचे संपादक डॉ. मनोहर सुरवाडे आहेत.

तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा ‘लोक रंगभूमी आणि लोक वाङ्मय’ हा ग्रंथही प्रकाशनाच्या मार्गावर असल्याची माहिती मिळाली आहे.

Previous articleरुद्राक्षबनाचा गाजावाजा, पण प्रत्यक्षात ओसाडपणा
Next articleकाळाने साधला घात; वीज कोसळून महिलेचा मृत्यू
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे