Home Breaking News बीएसएनएल टॉवरमागे खुलेआम गांजा सेवन

बीएसएनएल टॉवरमागे खुलेआम गांजा सेवन

◆ युवकावर एनडीपीएसचा गुन्हा

वणी वृत्तवेध :शहरात अंमली पदार्थांचे वाढते सावट पुन्हा एकदा समोर आले असून बी.एस.एन.एल. टॉवर परिसरात सार्वजनिक ठिकाणी खुलेआम गांजा सेवन करणाऱ्या युवकावर वणी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या घटनेमुळे शहरात अंमली पदार्थांचा वापर किती बिनधास्तपणे सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज विजय उपरे (वय २१, रा. जुना कॉटन मार्केट, आशीर्वाद हॉटेल मागे, वणी) हा युवक दि. २५ मे रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास बी.एस.एन.एल. टॉवरच्या पाठीमागील सार्वजनिक ठिकाणी झिंगलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गांजा भरलेली सिगारेट, माचीस तसेच “Tree Paper” असे लिहिलेले गांजा भरण्यासाठी वापरले जाणारे पेपर जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८ (क) व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.शहरात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन होत असताना पोलिस प्रशासनाने अधिक कठोर मोहीम राबविण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेले व्यसन चिंतेचा विषय बनला असून पालकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गजानन सावस करीत आहेत.

“शहरात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात वणी पोलीस कठोर कारवाई करीत आहेत. युवकांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना कोणतीही दया दाखविली जाणार नाही,”
गोपाल उंबरकर ठाणेदार, वणी

Previous articleमनसे नेते उंबरकर सह अन्य दोघांवर गुन्हे दाखल
Next articleबाजार समितीच्या जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे धोका वाढला
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे