Home Breaking News विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरांची भक्तिमय मैफल

विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरांची भक्तिमय मैफल

वणी वृत्तवेध : येथील लालगुडा परिसरातील वास्तूपर्क कॉलनीजवळ असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिर येथे भजन संध्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विदर्भातील नामवंत कलाकारांच्या सुरेल भजन व भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवन एकरे (भारतीय जनता पार्टी – जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा), वंदना चामाटे (ग्रामपंचायत सदस्य) व अनिल बोढाले (ग्रामपंचायत सदस्य) उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून अनील बोढाले (यवतमाळ जिल्हा भजन प्रमुख) तसेच गायक संतोष मानकर, घाटंजी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
या प्रसंगी गुणवंत विद्यार्थिनी लुकेश्री प्रशांत चौधरी,व निकिता प्रमोद वाभीटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भजन संध्येमध्ये गायिका सीमाताई काळे (खैरी, वर्धा), गायिका मीनाक्षी खंडारे (दिंडोडा, वर्धा), गायिका नलिनी नक्षीने (चंद्रपूर), गायक संचिन पंधरे (झरी), गायक अशोक मांडवकर (नांदेपेरा), तबलावादक शुभम बोबडे (वणी) व हार्मोनियम वादक विष्णू खुंटेमाटे (घुघूस) यांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिमय वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमासाठी शामदेव खाडे (अध्यक्ष – विठ्ठल मंदिर), सचिन मिलमिले (अध्यक्ष – रामनवमी उत्सव समिती, लालगुडा), विठ्ठल गाडगे, चेतन वांढरे, राजीव झाडे, विजय झाडे, उमेश पिदूरकर, प्रशांत मिलमिले, प्रवीण वाघमारे, ओम डेकोरेशन तसेच अभिलाष राजूरकर (साऊंड) यांचे सहकार्य लाभले.

Previous articleविधान परिषद निवडणुकीवर वणीत काँग्रेसचे मंथन
Next articleसमीर लेनगुळे युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे