Home Political समीर लेनगुळे युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

समीर लेनगुळे युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

वणी वृत्तवेध : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेत वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रातील युवा कार्यकर्ते समीर लेनगुळे यांची युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, युवकांना संघटित करण्यासाठी समीर लेनगुळे प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

अल्पावधीत पक्षनिष्ठा, सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्यामुळे समीर लेनगुळे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रात युवा सेनेला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

“युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याने पक्ष अधिक मजबूत होईल,” अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहेत.

Previous articleविठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरांची भक्तिमय मैफल
Next articleमरणोत्तर इच्छेला ताजने परिवाराचा मान
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे