◆ स्व. नामदेवराव ताजने यांचे नेत्रदान
वणी वृत्तवेध : वांजरी येथील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय नामदेवरावजी ताजने यांचे दिनांक 28 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असतानाच ताजने परिवाराने समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

जीवित असताना स्व. नामदेवराव ताजने यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या या इच्छेचा सन्मान राखत ताजने परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने वांजरी येथे येऊन स्व. ताजने यांचे नेत्र संकलित केले.

स्व. ताजने यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळण्याची आशा निर्माण झाली असून, त्यांच्या निधनानंतरही त्यांनी समाजसेवेचा संदेश दिला आहे. त्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत असून नेत्रदानाबाबत जनजागृतीसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.


स्व. नामदेवराव ताजने यांच्यावर दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता गायत्री मंदिर, वांजरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.”मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य स्व. नामदेवराव ताजने यांनी नेत्रदानातून केले आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
वणी वृत्तवेध तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!









