◆ घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
वणी वृत्तवेध :- विधान परिषदेचे बिबुल वाजले असून महाविकास आघाडी ने उमेदवार जाहीर केला आहे कॉग्रेस चे साहेबराव कांबळे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली असून आज दि 29 मे ला ते वणी येथे येणार असून महाविकास आघाडी तील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे

यवतमाळ विधान परिषदे ची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थाचे 453 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.महाविकास आघाडी व महायुती अशी सरळ लढत होणार असून काही अपक्ष देखील नामांकन अर्ज दाखल करणार आहे

वणी येथील मोरेश्वर उज्वलकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर महायुतीची जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने भाजपातील शुभेच्छुकां चा हिरमोड झाला आहे.शिंदे गटा कडून चर्चेत असलेल्या नावापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लवकरच कळणार आहे.


मात्र महाविकास आघाडीने जाहीर केलेले उमेदवार साहेबराव कांबळे हे तयारीला लागले आहे त्यांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी भेटी गाठी सुरू केल्या आहे त्याच अनुषंगाने ते आज सायंकाळी 5 वाजता वणी येथे येणार असून काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते संवाद साधणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकारी, व नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.








