Home Social अवघ्या महिन्याभरात 50 हजार वाचकांची पसंती

अवघ्या महिन्याभरात 50 हजार वाचकांची पसंती

◆ वणी वृत्तवेध चा वाचकांना सलाम

वणी वृत्तवेध :महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 1 मे रोजी सुरू करण्यात आलेल्या वणी वृत्तवेध या न्यूज पोर्टलला अल्पावधीतच वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत तब्बल 50 हजार वाचकांनी पोर्टलला भेट देत बातम्यांना पसंती दर्शविली आहे. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे वणी वृत्तवेध परिवाराने सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

वणी शहरासह परिसरातील घडामोडी, सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांतील ताज्या आणि वस्तुनिष्ठ बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वणी वृत्तवेध कडून सातत्याने केले जात आहे. विश्वासार्ह माहिती, वेगवान अपडेट्स आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे वाचकांनी या पोर्टलवर विश्वास दाखविला आहे.अवघ्या महिनाभरात मिळालेला 50 हजार वाचकांचा टप्पा हा केवळ आकडा नसून वाचकांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याची भावना वणी वृत्तवेध परिवाराने व्यक्त केली आहे.

वाचकांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच हा प्रवास शक्य झाला असून भविष्यातही अधिक दर्जेदार, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.वणी वृत्तवेध परिवाराने सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि सहकाऱ्यांचे आभार मानत, पुढेही असेच प्रेम व सहकार्य कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

“तुमचा विश्वास हीच आमची ताकद” या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वणी वृत्तवेध सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास आम्ही देत आहो

जिथे बातमी,तिथे वेध

Previous articleवणीत घरफोडी तीन लाखांचा ऐवज लंपास
Next articleवणीच्या ठाणेदारपदी भानुदास पिदूरकर
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे