Home Breaking News डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरवासीयांनी अभिवादन केले, शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला...

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरवासीयांनी अभिवादन केले, शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मान्यवरांनी देखील माल्यार्पण केले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरवासीयांनी त्यांना अभिवादन केले. सकाळपासूनच बाबसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी बघायला मिळाली. शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मान्यवरांनी देखील माल्यार्पण केले. त्यांचा समाजातील विषमता दूर करण्यासाठीचा लढा प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. तर आजच्या दिवशी राज्यघटनेत अभिप्रेत असलेले हक्क आणि कर्तव्ये स्मरणात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.