चंद्रपूर
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना आज आंबेडकरी अनुयायां सोबतच चंद्रपूरकरांनी अभिवादन केले. चंद्रपूर येथील बाबासाहेब आंबेडकर चौकातील परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राजकीय नेते, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज सकाळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी उपस्थित मान्यवाराने आपले मनोगतही व्यक्त केले, अभिवादन सोहळ्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीचे संयोजक प्रविण खोबरागडे, सामाजिक कार्यकर्ता एडवोकेट आशिष मुंधडा आदी मान्यवर उपस्थित होते.









