Home crime घरातच सुरू होता प्रतिबंधित बियाण्यांचा काळाबाजार

घरातच सुरू होता प्रतिबंधित बियाण्यांचा काळाबाजार

◆ कृषी विभागाची धडक कारवाई
◆ लाखांचे अवैध कापूस बियाणे जप्त

वणी वृत्तवेध :शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीवर अखेर कृषी विभागाने मोठी कारवाई करत वणी तालुक्यातील पळसोनी येथे तब्बल १ लाख १५ हजार ७० रुपयांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त केले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून “घरातूनच बियाण्यांचा काळाबाजार” सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी ता. वणी) याच्याविरोधात बियाणे अधिनियम १९६८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ६ मे रोजी रात्री ९ ते ९.२० वाजताच्या दरम्यान कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकला. यावेळी विविध नावांनी विक्रीस ठेवलेले “Pinkgard”, “5G”, “Research Hybrid” अशा लेबलचे प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांचे तब्बल ८१ पाकिटे आढळून आली.

जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये “माऊली-5”, “SURAKSHA”, “GALAXY HYPER”, “KAVERI SEEDS”, “JUMBO 5G”, “SILVER 5G”, “DHOOM 2” यांसारख्या विविध ब्रँडचा समावेश आहे. अनेक पाकिटांमधून नमुने घेऊन बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या बियाण्यांची विक्री केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अशा बियाण्यांमुळे उत्पादन घटणे, कीडप्रादुर्भाव वाढणे तसेच पीक पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका असल्याने कृषी विभाग सतर्क झाला आहे.
या कारवाईमुळे तालुक्यात अवैध बियाणे विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत असून कृषी विभाग आता आणखी तपासाच्या तयारीत आहे.

Previous articleउद्या लागणार दहावीचा निकाल,विद्यार्थ्यांची वाढली धडधड
Next articleएसपीएम ची आरोही ढेंगळे तालुक्यातून प्रथम
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे