Chandataknews

Chandataknews

दीक्षाभूमी मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 15-16 ऑक्टो रोजी होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येणार आहेत. गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक, जुना वरोरा नाका, मित्रनगर चौक परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांची प्रवेश बंदी आणि नो पार्किंग तसेच नो हॉकर्स झोन जाहीर करण्यात आला आहे. जड वाहनांसाठी नागपूर, मुल, बल्लारशा मार्गांवर पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून गरजेनुसार काही ठिकाणी वाहन थांबवले जातील. दुचाकी व हलकी वाहने वरोरा नाका, आंबेडकर महाविद्यालय ते टि.बी. हॉस्पिटलपर्यंतचा मार्ग टाळावा, तर रामनगर आणि वडगाव परिसरातील नागरिकांनी दवा बाजार-केवलराम चौक मार्गे प्रवास करावा.नागपूर रोड, शहर, वडगाव, आकाशवाणी तसेच मुल रोड परिसरातून येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग स्थळे निश्चित केली आहेत. ही व्यवस्था 15 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेपासून 17 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. नागरिकांनी नियमांचे पालन करूनच प्रवास व पार्किंग करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.










