Home Political शेती हंगामावर डिझेल टंचाई, मनसे आक्रमक

शेती हंगामावर डिझेल टंचाई, मनसे आक्रमक

◆ २ दिवसांत पुरवठा सुरळीत करा
◆ अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

वणी वृत्तवेध : शेती हंगाम तोंडावर असताना ट्रॅक्टरद्वारे मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. बाजारात कृत्रिम डिझेल टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. डिझेलचा पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास प्रशासन आणि पेट्रोल पंपांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून इशारा दिला आहे. सध्या शेतीच्या मशागतीची अत्यंत महत्त्वाची वेळ असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करत आहेत. मात्र ऐन हंगामात डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत असून बळीराजाला आर्थिक फटका बसत आहे.

मनसेने प्रशासनाकडे तातडीने सर्व पेट्रोल पंपांना आदेश देऊन शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार विनाव्यत्यय डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “डिझेल अभावी एकाही शेतकऱ्याचे काम थांबता कामा नये. पुढील दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

फाल्गुन गोहोकार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि संबंधित पेट्रोल पंप चालकांची राहील.”

शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी मनसेने केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी (यवतमाळ), उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी), तहसीलदार (वणी) तसेच पोलीस स्टेशन वणी येथे देण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे यांच्यासह राकेश वैद्य, विनोद कुचनकर, धीरज पिदुरकर, वैभव पुराणकर, गोविंदराव थेरे, प्रतीक बुरडकर, मंगेश येटे, आशिष ठावरी, भोला चिकनकर, प्रवीण मांडवकर, प्रदीप बदखल, चेतन काळे, गोवर्धन पिदुरकर, मनोज उरकुडे, देवा साखरकर, सुरज काकडे, धीरज बगवा, कैलास धांडे, सुरज लोंढे, यशवंत ढोके, बबलू चोपणे, संदीप अवगान, अजय तुराणकर यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.

“सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने इंधन दरवाढीसाठीच हा डाव रचला जात असून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार मनसे कदापि सहन करणार नाही,महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे.
फाल्गुन गोहोकार
तालुकाध्यक्ष, मनसे

Previous articleखोट्या सातबार्‍यावर प्लॉट विक्री करून फसवणूक
Next articleतलाठी व मंडळ अधिकाऱ्याची अटकपूर्व जामिनासाठी धाव
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे