◆१००% निकालाने उज्ज्वल यश
वणी वृत्तवेध :येथील नांदेपेरा रोडवरील स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूल मधील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

शनिवार दि 2 मे ला रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र रेड्डी होते. यावेळी शाळेच्या प्राचार्या जे.अन्नपुर्णा पवन व उपप्राचार्य विक्की मोहनानी उपस्थित होते. फेब्रुवारी मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये कु. सानिका कांबळे हिने ९८.८०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य कुशवाह द्वितीय, तर हर्ष पावडे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या एकूण ५४ विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.


यंदा शाळेतील एकूण १७८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेचा १००% निकाल लागला, ही उल्लेखनीय कामगिरी ठरली.यावेळी अध्यक्ष डॉ. नरेंद्र रेड्डी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच उत्कृष्ट निकालासाठी प्राचार्या, शिक्षकवृंद व पालकांचेही कौतुक करण्यात आले.हा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी उत्सव ठरला.









