◆तालुक्याचा निकाल ७५.२२टक्के
◆निकालात घसरण
वणी वृत्तवेध :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर केला. यावर्षी निकालाची टक्केवारी घसरली असुन ७५.२२टक्के निकाल लागला. परीक्षेवर सीसीटीव्हीचा वाँच असल्याने निकालात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. वणी तालुक्यातील एकाही शाळेचा निकाल १००% लागला नाही.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विध्यार्थीनी अष्टांगी चंदू परेकर ही 94.83 टक्के गुण मिळवून तालुक्यातून अव्वल आली आहे. तर याच महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची स्वरा महेश मुळेवार 94 टक्के गुण घेऊन दुसरी आली आहे

फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे वणी तालुक्यातून 1772 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील1333विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाची अष्टांगी परेकर 94.86 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातुन प्रथम आली आहे. तर याच महाविद्यालयाची स्वाती मूळेवार हीने 94 टक्के गुण मिळवत तालुक्यातुन दुसरे स्थान प्राप्त केले आहे.


● शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे ●
लोकमान्य टिळक महाविद्यालय ७९.४२टक्के
शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय ८३.६९ टक्के,आदर्श जुनियर कॉलेज घोंसा ५९.२५ टक्के,पंचशील जुनियर कॉलेज नांदेपेरा ५५.३५ टक्के,गुरुदेव जुनियर कॉलेज शिरपूर ७८.१२ टक्के,जी प उर्दू जुनियर कॉलेज वणी ३३.३३ टक्के,आदर्श जुनियर कॉलेज वणी ८७.५० टक्के,आदर्श ज्यूनी.काँलेज वणी ३३.३३,राष्ट्रीय जुनियर कॉलेज राजूर ५५.५५ टक्के, आदर्श जुनियर कॉलेज शिंदोला ८३.३३ टक्के, जगन्नाथ बाबा जुनियर कॉलेज वांजरी ३० टक्के, वणी पब्लिक स्कूल ९३.८४टक्के, जगन्नाथ महाराज जुनियर कॉलेज वणी ८० टक्के,नुसाबाई चोपणे उच्च माध्य.विद्यालय वणी ७९.०६ टक्के,
वणी लायन्स इंग्रजी मिडीयम स्कूल ९४.४४ टक्के, राजे संभाजी जुनियर कॉलेज कायर ३८.८८ टक्के, महात्मा ज्योतिबा फुले जुनियर कॉलेज कायर ४६.५७ टक्के,भास्करराव ताजने जुनियर कॉलेज वेळाबाई ६८.५७टक्के,भास्करराव ताजने उच्च माध्यमिक विद्यालय कळमना ५४.८३टक्के,








