Home crime वणीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी

वणीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी

७ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

वणी वृत्तवेध :वणी शहरातील लालगुडा चौफुली परिसर तसेच ज्योती बार गल्ली परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर वणी पोलिसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये कारवाई केली. ही कारवाई दि. २४ एप्रिल २०२६ व ८ मे २०२६ रोजी करण्यात आली.

या प्रकरणी आरोपी म्हणून गोपी किसन लोणारे (रा. रामपुरा वार्ड, वणी), अमित किसन घेडांगे (रा. भाग्यशाली नगर, वणी), मंगेश बबन बदखल (रा. भालर) व अजय बलेश्वर मांझी (रा. रंगनाथ नगर, वणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ७ हजार १६० रुपयांचा नगदी मुद्देमाल जप्त केला. वणी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून अवैध जुगार अड्ड्यांवर छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा कारवाया पुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी परिसरातील बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी केले आहे.

Previous articleकोळसा खाणीत अचानक मातीचा डोंगर कोसळला
Next articleमनी लॉंड्री प्रकरणात मुंबई पोलीस वणीत
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे