Home crime जावयावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील तिघे ताब्यात

जावयावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील तिघे ताब्यात

◆ अल्पवयीन बालकाचा समावेश
◆ एकाचा शोध सुरू

वणी वृत्तवेध : शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री जावयावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे फरार असलेल्या चार आरोपी पैकी तिघांना शनिवारी चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे तर एका आरोपीचा शोध सुरू आहे.

गुरुवारी मध्यरात्री अक्षय राजेंद्र बोढे (२८) याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्याचे काका विजय बोढे व काकूंनाही मारहाण करण्यात आली होती. तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.

पोलिस तपासात या हल्ल्यामागे कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. अक्षयच्या पत्नीला कथित त्रास होत असल्याच्या कारणावरून तिचा भाऊ अमन रामानंद घागी हा चार साथीदारांसह वणी येथे आला होता. यानंतर झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले.
घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अमन घागी याला तात्काळ अटक केली होती.

पुढील तपासादरम्यान हल्ल्यात एका अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. फरार असलेल्या चौघांचा शोध घेण्याकरिता ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी विशेष पथके रवाना केली होती या पथकाने शनिवारी अल्पवयीन बालका सह मनीष इंगळे वय 22 व रोहन खंडारे वय 20 दोघे राहणार चंद्रपूर यांना ताब्यात घेतले आहे तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे

अल्पवयीनांचा गुन्ह्यात सहभाग चिंतेचा विषय
शास्त्रीनगर येथील हल्ला प्रकरणात एका अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीनांचा सहभाग असल्याने सामाजिक स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. बालवयात गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.

Previous articleघोषणा नाही, कृतीतून दाखवली सामाजिक बांधिलकी
Next articleवणीत प्रथमच नर्सिंग व फार्मसी शिक्षणाची सुवर्णसंधी
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे