Home Breaking News बारावीत अष्टांगी परेकर तालुक्यातून अव्वल

बारावीत अष्टांगी परेकर तालुक्यातून अव्वल

◆तालुक्याचा निकाल ७५.२२टक्के
◆निकालात घसरण

वणी वृत्तवेध :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर केला. यावर्षी निकालाची टक्केवारी घसरली असुन ७५.२२टक्के निकाल लागला. परीक्षेवर सीसीटीव्हीचा वाँच असल्याने निकालात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. वणी तालुक्यातील एकाही शाळेचा निकाल १००% लागला नाही.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विध्यार्थीनी अष्टांगी चंदू परेकर ही 94.83 टक्के गुण मिळवून तालुक्यातून अव्वल आली आहे. तर याच महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची स्वरा महेश मुळेवार 94 टक्के गुण घेऊन दुसरी आली आहे

फेब्रुवारी 2026  मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे वणी तालुक्यातून 1772 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील1333विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाची अष्टांगी परेकर 94.86 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातुन प्रथम आली आहे. तर याच महाविद्यालयाची स्वाती मूळेवार हीने 94 टक्के गुण मिळवत तालुक्यातुन दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

  ● शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे ●
लोकमान्य टिळक महाविद्यालय ७९.४२टक्के
शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय ८३.६९ टक्के,आदर्श जुनियर कॉलेज घोंसा ५९.२५ टक्के,पंचशील जुनियर कॉलेज नांदेपेरा ५५.३५ टक्के,गुरुदेव जुनियर कॉलेज शिरपूर ७८.१२ टक्के,जी प उर्दू जुनियर कॉलेज वणी ३३.३३ टक्के,आदर्श जुनियर कॉलेज वणी ८७.५० टक्के,आदर्श ज्यूनी.काँलेज वणी ३३.३३,राष्ट्रीय जुनियर कॉलेज राजूर ५५.५५ टक्के, आदर्श जुनियर कॉलेज शिंदोला ८३.३३ टक्के, जगन्नाथ बाबा जुनियर कॉलेज वांजरी ३० टक्के, वणी पब्लिक स्कूल ९३.८४टक्के, जगन्नाथ महाराज जुनियर कॉलेज वणी ८० टक्के,नुसाबाई चोपणे उच्च माध्य.विद्यालय वणी ७९.०६ टक्के,
वणी लायन्स इंग्रजी मिडीयम स्कूल ९४.४४ टक्के, राजे संभाजी जुनियर कॉलेज कायर ३८.८८ टक्के, महात्मा ज्योतिबा फुले जुनियर कॉलेज कायर ४६.५७ टक्के,भास्करराव ताजने जुनियर कॉलेज वेळाबाई ६८.५७टक्के,भास्करराव ताजने उच्च माध्यमिक विद्यालय कळमना ५४.८३टक्के,

 

Previous articleमारेगावात मध्यरात्री पुतळा, सकाळी तणाव!
Next articleस्वर्णलीला शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे