◆आज भव्य सोहळा
वणी वृत्तवेध : एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपूर यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता (गोरज मुहूर्त) करण्यात आले आहे. हा सोहळा संताजी सभागृह, प्लॉट नं. ७७, गणेश नगर, नागपूर येथून पुढे रॉयल माँ गंगा सेलिब्रेशन, पारडी (पुनापुर), भंडारा रोड, नागपूर येथे संपन्न होणार आहे.

समाजातील जास्तीत जास्त वर-वधूंनी या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सामाजिक एकतेस हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वर-वधू व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष सवलती व सुविधा देण्यात आल्या आहेत. नोंदणी शुल्क प्रत्येकी वर व वधू परिवारासाठी ७५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. वधूंना संसारोपयोगी स्टील आलमारी व पाच भांडी भेट म्हणून देण्यात येणार आहेत.

सोहळ्याची खास वैशिष्ट्ये म्हणजे वधूंची डोलीतून एन्ट्री आणि वरांची राजेशाही पद्धतीत लग्न मंडपात एन्ट्री होणार आहे. तसेच नवरदेवांच्या सामूहिक वरातीसाठी घोडा, बॅण्ड, फटाके यांसह सर्व व्यवस्था आयोजन समितीद्वारे करण्यात येणार आहे.याशिवाय, वर-वधूंच्या पालकांचा तसेच नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार असून सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


या उपक्रमाचे अध्यक्ष गजानन उ. भजभुजे, सचिव देवेंद्र कैकडे, सहसचिव सुरेंद्र ठाकरे व आणि इतर पदाधिकारी व समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात येत आहे.विदर्भातील एरंडेल तेली समाजाच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








