Home Breaking News उकणी दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर खासदार धानोरकरांचा सवाल

उकणी दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर खासदार धानोरकरांचा सवाल

◆ कामगार सुरक्षेबाबत प्रशासनाला दिले निर्देश

वणी वृत्तवेध : वणी उत्तर क्षेत्रातील उकणी कोळसा खाणीत झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.आणि कामगार सुरक्षेबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहे

या भीषण दुर्घटनेत मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने दोन डंपर ढिगाऱ्याखाली दबले गेले. मात्र, डंपर चालकांनी दाखवलेल्या सतर्कता आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

घटनास्थळी खासदार धानोरकर यांनी उपस्थित कामगारांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला. तसेच वेकोलीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी कोळसा खाण प्रशासनाने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच कामगारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

उकणी कोळसा खाणीत घडलेल्या या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पाहणी दौऱ्यात WCL TSC सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, प्रमोदभाऊ वासेकर, राजीव अंकितवार, अशोक चिकटे, विकेश पानघाटे, नंदू आसुटकर साहेब, बंडुभाऊ खीरटकर, मनोज खाडे, दादा खेडेकर, सुभाष ढवळे तसेच उकणी गावासह परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवेकोली कामगार नेत्याची सुरक्षा समितीतून हकालपट्टी
Next articleशहराला शुद्ध पाणी की दूषित धोका ?
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे