Home advertise ४२ वर्षांची यशस्वी परंपरा, डी. फार्म प्रवेशाला सुरुवात

४२ वर्षांची यशस्वी परंपरा, डी. फार्म प्रवेशाला सुरुवात

◆ फार्मसी क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

वणी वृत्तवेध : शिक्षण प्रसारक मंडळ, द्वारा संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वणी येथे शैक्षणिक वर्षासाठी डी. फार्म (Diploma in Pharmacy) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय परिसरात स्थित असलेल्या या संस्थेला यशस्वी ४२ वर्षांची परंपरा लाभली असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (P.C.I.) मान्यता प्राप्त संस्था म्हणून ओळख आहे.

संस्थेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, परिपूर्ण शैक्षणिक सुविधा, अद्ययावत वाचनालय तसेच अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. दरवर्षी संस्थेचा निकाल ७० टक्क्यांपेक्षा अधिक लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संस्थेबाबत आकर्षण वाढले आहे.

१२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून टक्केवारी व वयोमर्यादेची अट नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून SC/ST/NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्यात आले आहे. OBC/SBC विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश शुल्क सवलत देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्राचार्य : 9822227718, ऑफिस: 07239-225178 प्रवेश समिती  9420371773 /9422867742/ 9420046037/ 9511761250/
9823793332संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleपाच वर्षांत 120 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
Next articleसमाजहिताच्या उपक्रमांनी रंगणार संजय खाडे यांचा वाढदिवस
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे