◆ शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
वणी वृत्तवेध :शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. 23 मे ला वणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे.

सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अपघात, शस्त्रक्रिया व विविध आजारांमुळे रक्ताची गरज सतत भासत असल्याने रक्तदानासारखा उपक्रम समाजासाठी महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात साहित्य वाटप करण्यात येणार असून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटपही केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक व रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


तसेच संध्याकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके राहणार आहेत. या कार्यालयाचे संचालक धनंजय खाडे असून विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन व्यवसाय सुरू करण्यात येत आहे.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.









