◆ फार्मसी क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी
वणी वृत्तवेध : शिक्षण प्रसारक मंडळ, द्वारा संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वणी येथे शैक्षणिक वर्षासाठी डी. फार्म (Diploma in Pharmacy) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय परिसरात स्थित असलेल्या या संस्थेला यशस्वी ४२ वर्षांची परंपरा लाभली असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (P.C.I.) मान्यता प्राप्त संस्था म्हणून ओळख आहे.

संस्थेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, परिपूर्ण शैक्षणिक सुविधा, अद्ययावत वाचनालय तसेच अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. दरवर्षी संस्थेचा निकाल ७० टक्क्यांपेक्षा अधिक लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संस्थेबाबत आकर्षण वाढले आहे.

१२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून टक्केवारी व वयोमर्यादेची अट नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून SC/ST/NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्यात आले आहे. OBC/SBC विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश शुल्क सवलत देण्यात येणार आहे.


प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्राचार्य : 9822227718, ऑफिस: 07239-225178 प्रवेश समिती 9420371773 /9422867742/ 9420046037/ 9511761250/
9823793332संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








