◆विजेचा लपंडाव कधी थांबणार
वणी वृत्तवेध :शहरातील प्रभाग क्र. २ मधील प्रगतीनगर परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना वारंवार विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहे या पार्श्वभूमीवर नगरसेविका रिता महेश पहापळे यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देऊन परिसरात नवीन डी.पी. बसविण्याची मागणी केली आहे.

परिसरात सध्या वीज पुरवठा कमी दाबाने होत असून त्यामुळे नागरिकांना वारंवार वीज खंडित होणे, कमी-जास्त दाबाने वीज येणे तसेच विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यमान डी.पी.वर अतिरिक्त भार असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांना सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा मिळावा यासाठी प्रगतीनगर परिसरात तातडीने नवीन डी.पी. बसवून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका रिता महेश पहापळे यांनी केली निवेदन देते वेळी विवेक देशपांडे, आशिष डंभारे, महेश पहापळे सह प्रगतीनगर येथील नागरिक उपस्थित होते









