Home Social संघर्ष, संवेदना आणि समाजकारण जपणारे नेतृत्व : संजय खाडे

संघर्ष, संवेदना आणि समाजकारण जपणारे नेतृत्व : संजय खाडे

वणी वृत्तवेध :- राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा मार्ग नसून समाजाच्या प्रश्नांसाठी झटण्याची जबाबदारी असते, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारे नाव म्हणजे संजय रामचंद्र खाडे. युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या संजय खाडे यांनी सुरुवातीपासूनच सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. विविध लोकहिताच्या आंदोलनांतून त्यांनी युवकांचा बुलंद आवाज बनत आपल्या नेतृत्वाची छाप उमटवली.

उकणी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या संजय खाडे यांनी गावाच्या सरपंचपदाची धुरा सांभाळताना विकासाचा नवा आदर्श निर्माण केला. वेकोलीच्या निधीतून गावात विविध विकासकामे राबवून त्यांनी उकणीच्या प्रगतीला गती दिली. रस्ते, मूलभूत सुविधा आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आजही ग्रामस्थांच्या स्मरणात आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना जिल्हास्तरापासून प्रदेशस्तरापर्यंत काम करण्याची संधी दिली. आज ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही संजय खाडे यांची ओळख निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाची संधी मिळावी या हेतूने त्यांनी शहरात वातानुकूलित अभ्यासिका सुरू केली. या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत उच्च पदांवर मजल मारली आहे. शिक्षण क्षेत्रातील हे योगदान अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरले आहे.

सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रस्थानी राहिले आहेत. रक्तदान शिबिरे, रुग्णालयांमध्ये फळवाटप, आरोग्य शिबिरे अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता जपली आहे. बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी वेकोलीविरोधात अनेक वेळा संघर्ष उभारला आणि अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे युवकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाला आहे.

खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर व खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सानिध्यात त्यांनी राजकारणातील परिपक्वता आत्मसात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारण आणि जनसंपर्क यांचा उत्तम समतोल त्यांनी साधला. पणन संचालकपदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या कार्याचीच पोचपावती मानली जाते.

संयमी, मनमिळाऊ आणि सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून संजय रामचंद्र खाडे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अशा अभ्यासू, संघर्षशील आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

Previous articleकमी दाबाच्या वीज पुरवठ्याने प्रगतीनगरकर त्रस्त
Next articleमराठी कामगारांच्या घामावर उद्योग, पण न्याय मात्र परप्रांतियांना?
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे