◆ रात्रीस खेळ चाले रेतीचा
वणी वृत्तवेध :- रात्री रेती उत्खनन करण्यास कायद्याने बंदी आहे मात्र सध्या शहरात रात्रीस खेळ चाले रेतीचा हा प्रकार सुरू आहे रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला दि 25 मे ला मध्यरात्री नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे

रेती घाटाची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे आणि आता रेती सहज उपलब्ध होत असल्याने रेतीची मागणी कमी झाल्याने दरही पडले आहे त्यामुळे घाटधारक साठवणुकीवर जोर देत आहे रात्री भरधाव वाहन चालून रेतीचा साठा जमा करीत आहे

शहरात शहराबाहेरील खुल्या जागेत रेतीचे मोठं मोठे ढिगारे उभे राहिले आहे हे कोणाचे आहे हे देखील कळायला परिसरातील नागरिकांना मार्ग नाही रात्री वाहतूक करणाऱ्या वाहन चालका कडे परवाना आहे की नाही याची खातरजमा कोण करणार हे देखील कोडे बनले आहे


दि 25 मे ला रात्री 11 वाजताचे सुमारास लोकमान्य टिळक महाविद्यालया समोर काही युवक आपल्या दुचाकी सह उभे असतांना रेती चे वाहन भरधाव वेगाने आले या उभ्या असलेल्या युवकांच्या अंगावर येत असल्याने युवक बाजूला झाले त्यानंतर या युवकांनी त्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला पकडून चांगलाच चोप दिला
माजी नगरसेवक सिद्दीक रंगरेज व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालकाला युवकांच्या ताब्यातून कसेबसे सोडवले चालक मदधुंद अवस्थेत असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी वणी वृत्तवेध ला दिली रात्री रेतीचे उत्खनन व वाहतूकी वर बंदी असतांना ही वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे

रात्रभर बिधास्तपणे सुरू असलेल्या या रेती वाहतुकीला महसूल व पोलीस प्रशासन आळा घालतील का घे बघणे महत्वाचे आहे की एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल का असा सवाल नागरिक करीत आहे








