Home Social घोषणा नाही, कृतीतून दाखवली सामाजिक बांधिलकी

घोषणा नाही, कृतीतून दाखवली सामाजिक बांधिलकी

◆ नंददीप फाउंडेशनला ५० हजारांची मदत

वणी वृत्तवेध :आजच्या काळात मंचावर अनेक आश्वासने दिली जातात; मात्र ती प्रत्यक्षात पूर्ण करणारे हात फार कमी असतात. वणीचे माजी आमदार तथा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी दिलेला शब्द पाळत नंददीप फाउंडेशन, यवतमाळ यांना ५० हजारांची आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मागील महिन्यात वणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात नंददीप फाउंडेशनच्या सेवाकार्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडण्यात आली होती. बेघर, निराधार, मनोरुग्ण आणि मतिमंद बांधवांसाठी सुरू असलेले कार्य पाहून अनेकजण भावूक झाले होते.

या कार्यक्रमात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल कडून नंददीप संस्थेला ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती त्यांनी नुकतीच यवतमाळ येथे जाऊन नंददीप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष धनादेश सुपूर्द केला आहे यावेळी संस्थेच्या पुस्तकात त्यांनी सेवाकार्याबद्दल आपला अभिप्राय नोंदवून संस्थेच्या कामाचे कौतुक केले आहे.

समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना अशा प्रकारच्या मदतीची मोठी गरज असते. या सहकार्यामुळे संस्थेच्या कार्याला आर्थिक बळ मिळाले असून समाजातील इतर दानशूर व्यक्तींनाही प्रेरणा मिळणार आहे.

नंददीप फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून, “दानाची किंमत रकमेपेक्षा त्यामागील संवेदनशीलतेत असते,” अशा भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या

Previous articleबेसा येथे भीषण आग, गोठ्यातील आठ बकऱ्या जळून मृत्युमुखी
Next articleजावयावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील तिघे ताब्यात
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे