◆ एन.बी.एस.ए. कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
वणी वृत्तवेध : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्न एन.बी.एस.ए. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वणी येथे नवीन शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी बी.ए. व बी.कॉम. या पदवी अभ्यासक्रमांसोबतच विविध रोजगाराभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाविद्यालयामार्फत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या अभ्यासकेंद्राद्वारे शिक्षणाची संधी उपलब्ध असून नियमित शिक्षणासोबत कौशल्याधारित प्रशिक्षणावरही भर दिला जात आहे.

Lifelong Learning and Extension Department अंतर्गत Cashier, Tally आणि DTP हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.


तसेच होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नगर परिषद शाळा क्रमांक ७ जवळ, अहमद ले-आऊट, विठ्ठलवाडी वणी, मोबाईल नंबर 7498200475 या वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.








