Home Political दणक्यात साजरा झाला पश्चिम बंगालचा विजय

दणक्यात साजरा झाला पश्चिम बंगालचा विजय

◆ घोषणाबाजीने दुमदुमले वणी शहर

वणी वृत्तवेध : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ घडवून आणली. या विजयाचा आनंद वणी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.

गेल्या अनेक वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला यावेळी भाजपाने जोरदार आव्हान देत तब्बल 200 च्या वर जागांवर विजय मिळवला असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या पार्श्वभूमीवर वणीतील वातावरण जल्लोषमय झाले.शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली तसेच झलमूरी वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष विद्या आत्राम, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपलशेंडे, प्रदीप जेऊरकर,पवन एकरे, महादेव खाडे,अंकुश बोढे, संतोष डंभारे, शहराध्यक्ष ऍड निलेश चौधरी, नगरसेवक रवी बेलूरकर लवलेश लाल, लक्ष्मण उरकुडे, अनिल चिंडालिया,आशिष डंभारे,नीता पिदूरकर,नगरसेविका रिता पहापळे, मनीषा गव्हाणे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला.एकूणच, पश्चिम बंगालमधील या विजयाने वणी शहरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

पश्चिम बंगालमधील हा विजय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून, तो देशातील जनतेचा विकासाभिमुख राजकारणावर असलेला विश्वास दर्शवतो. या यशामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून आगामी काळातही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,”
संजीवरेड्डी बोदकुरवार
माजी आमदार

Previous articleखत खरेदीत ‘लिंकिंग’ केल्यास गाठ मनसेशी
Next article“नियम धाब्यावर, डीजे जोरावर”
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे