Chandataknews
Chandrapur
बल्लारपूर येथील BIT-ITI संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा.
पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कमावले पारितोषिके
चंद्रपूर:– बल्लारपूर येथील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामणी (BIT-ITI)मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढविणे हा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीजतंत्री द्वितीय वर्षाच्या जानवी मेश्राम यांनी केले तर गटनिर्देशक अविनाश बा. पाटील यांनी सांगता करत उपस्थितांचे आभार मानले.
संविधान दिनाच्या पूर्वी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी “१९४७ पूर्वीचा भारत” या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण राजपालजी कांबळे यांनी केले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक आशिष शाह (वीजतंत्री – प्रथम वर्ष), द्वितीय पारितोषिक आशिष्क रामटेके (वीजतंत्री – द्वितीय वर्ष) आणि तृतीय पारितोषिक मोहनसिंग राठोड (जोडपुण – द्वितीय वर्ष) यांना त्यांच्या सर्जनशीलतेसह विषयाची उत्तम पकड असल्याबद्दल गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
बल्लारपूर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जाहिद एच. अन्सारी यांनी सर्व प्रशिक्षणार्थी व निर्देशक वर्गाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली व संविधानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती झाली. संस्थेने भविष्यात असे शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सतत राबवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, हा उत्सव विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा ठरला.








