Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयात आधार केंद्राचे उद्घाटन संपन्न

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयात आधार केंद्राचे उद्घाटन संपन्न

0
201

मुल:- तालुक्यातील मौजा बेंबाळ येथे ग्रामपंचायत कार्यालयात‌ आधार केंद्राचे उद्घाटन सरपंच चांगदेव केमेकार तथा उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील नागरिकांना आधार संबंधीत कामे करण्यासाठी सोपे जावे याकरीता ग्रामपंचायत कार्यालयाने हा उपक्रम सुरू केला. आधारशी संबंधित आधार अपडेट करणे, मोबाईल क्रमांक, पत्ता अपडेट करणे असे संपूर्ण कामे करण्यात येणार आहेत.सदर आधार केंद्राचा लाभ गावातील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन सरपंच चांगदेव केमेकार यांनी गावकऱ्यांना केले.सदर उद्घाटनप्रसंगी सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, संतोषजी शनगनवार,सुनिल गददेकार तथा ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here