Chandataknews
Chandrapur
चंद्रपूर, 21 जुलै 2025 :
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ (Shika ani Kamva) ही नाविन्यपूर्ण योजना 2022-23 पासून राबवली जात आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना एकाच वेळी 12वी नंतरच्या पदवी शिक्षणासोबतच तीन वर्षे कार्यालयीन कामाचा अनुभव (फुलटाईम इंटर्नशिप) घेता येतो आणि त्याबदल्यात दरमहा विद्यावेतन मिळते.
यंदाच्या वर्षी सुद्धा काही निवडक विद्यार्थ्यांना ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ (Digital and AI Facilitator) म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे.
इंटर्नशिप कालावधी—तीन वर्षे—दरम्यान विद्यार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) दूरस्थ BBA (Bachelor in Business Administration) या अभ्यासक्रमात शिक्षण घेणार आहेत. या काळात:
विद्यावेतन:
पहिले वर्ष: ₹८,०००/महिना
दुसरे वर्ष: ₹९,०००/महिना
तिसरे वर्ष: ₹१०,०००/महिना
दुहेरी फायदा:
तीन वर्षांचे कार्यानुभव प्रमाणपत्र (Work Experience Certificate)
IGNOU कडून BBA पदवी
स्वतःच्या कष्टाच्या कमाईवर शिक्षणाची संधी
स्पर्धात्मक युगासाठी तयार होणारे, कामावर आधारित शिक्षण.
पात्रता:
ग्रामीण चंद्रपूरमधील १८-२५ वयोगटातील, नुकतीच बारावी पास केलेली SC/ST/VJ/NT प्रवर्गातील विद्यार्थी
संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचा प्रभावी वापर करता येणे आवश्यक
अर्जाचा शेवटचा दिवस:
२४ जुलै २०२५
अर्जासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषदेकडून उपलब्ध आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचे आवाहन केले आहे.








