
सामाजिक दायित्व जाणून प्रसंगी गरजवंताला एक हात मदतीचा या उद्धार भावनेने स्थापन झालेल्या मूल येथिल संस्कार कलश च्या वतीने मुल शहरातील प्रतिभा प्रकाश दामपल्लीवार या गरजूला एलपीजी वर चालणारी प्रेस भेट देऊन मदत केली. प्रतिभा हे लोकांचे कपडे प्रेस करून उदरनिर्वाह करीत आहे. लोखंडी प्रेस आणि कोळशाचा वापर करून कपडे प्रेस करीत असल्याने दामपल्लीवार यांना त्रास होत होता. संस्कार कलश एलपीजी वर चालणारी प्रेस दिल्याने दामपल्लीवार यांचा त्रास कमी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी प्रतिभा प्रकाश दामपल्लीवार यांनी संस्कार कलश चे आभार मानले. यावेळी संस्कार कलशच्या अध्यक्षा डॉ. राजश्री मुस्तीलवार, उपाध्यक्ष श्वेता चिंतावार, सचिव सीमा बुक्कावार, जयश्री चन्नूरवार, वंदू बुक्कावार, सपना निमगडे, अनिता गोगुलवार, चेतना व्यास, प्राची कुलकर्णी, मंगला तुंडूरवार, मीनाक्षी छोनकर आदी उपस्थित होते.







